दिवसभरात १५,२२९ नव्या बाधितांचे निदान; ३०७ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गुरुवारी २५,६१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५४,८६,२०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७३% एवढे झाले आहे. सध्या २ लाख ४ हजार ९७४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. राज्यात गुरुवारी दिवसभरात १५,२२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३०७ करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यातील मृत्यूदर १.६८% एवढा आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,९१,४१३ झाली असून, मृतांचा आकडा ९७ हजार ३९४ आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५७,७४,६२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.१९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १५,६६,४९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर, ७,०५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात गुरुवारी आठ जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नसल्याचे दिसून आले. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ३०७ मृत्यूंपैकी २२८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
.....................................