सांताक्रूझमधील पंचतारांकित हॉटेलमधून दोन लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 05:58 AM2017-11-20T05:58:41+5:302017-11-20T05:59:29+5:30
एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या ६४ वर्षांच्या अनिवासी भारतीयाची, दोन लाखांची रोकड लंपास झाल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
मुंबई : पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या ६४ वर्षांच्या अनिवासी भारतीयाची, दोन लाखांची रोकड लंपास झाल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमधील कर्मचाºयाने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे.
युनायटेड किंगडम(यूके)मधील मुकेश मदनलाल नथवाणी हे कामानिमित्त ४ नोव्हेंबरला मुंबईला आले होते. जुहू तारा रोडवरील सी प्रिन्सेस हॉटेलमधील २०३ नंबरच्या रूममध्ये ते उतरले होते. त्यांनी खोलीतील लॉकरमध्ये दोन लाख रुपये ठेवले होते. मात्र, कोणीतरी ही रक्कम काढून घेतली. नथवानी यांना हा प्रकार समजल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणला. त्यानंतर, शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.