Join us

सणांदरम्यान दोन लाखांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 6:05 AM

मुंबई : सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठांमध्ये लाखो-करोडोंची उधळण होते. याच काळात भेसळ, बनावट पदार्थांचे प्रमाणही वाढत असते.

मुंबई : सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठांमध्ये लाखो-करोडोंची उधळण होते. याच काळात भेसळ, बनावट पदार्थांचे प्रमाणही वाढत असते. या दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सर्तकता बाळगून विशेष मोहीम राबवित असतो. आॅगस्ट ते आॅक्टोबर या सण, उत्सवांच्या काळात राबविलेल्या मोहिमेत मुंबई शहर-उपनगरातूंन जवळपास दोन लाख रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली. कारवाईत १ लाख ५० हजार ४२७ रुपयांचे १९६० किलोचे खाद्यतेल आणि ४८ हजार ५०० रुपयांची २०८ किलोची स्पेशल मिठाई एफडीएने जप्त केली आहे.अन्न व औषध प्रशासनाने गणेशोत्सव, दिवाळी सणासाठी येणाºया भेसळयुक्त पदार्थावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत पीठ, रवा, मैदा, बेसन, खाद्यतेल, वनस्पती तूप चॉकलेट, फराळ, बेकरी उत्पादने तसेच सुकामेवा असे मुंबई शहर-उपनगरांतून नमुने गोळा केले. एक लाख ९८ हजार ९२७ रुपयांच्या किमतीचा माल जप्त केला. याखेरीज, काही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :अन्नमुंबई