Join us

उद्यापासून ठाणे - वाशी - ठाणे दरम्यान दोन लोकल फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 6:25 PM

ट्रान्स हार्बर मार्गावरून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकल सुरु

मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरून राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी सोमवारपासून लोकल सेवा सुरु होणार आहे. ठाणे - वाशी - ठाणे दरम्यान दोन लोकल फेऱ्या धावणार आहेत.

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून लोकल सुरु झाली होती. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावरून लोकल प्रवास सुरु झाला नाही. परिणामी, येथील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करताना अडचणी येत होत्या. मात्र सोमवारपासून ट्रान्स हार्बर मार्गावरून लोकल धावणार आहे. ठाणे येथून सकाळी वाशीला जाणारी विशेष लोकल असेल. तर, ठाण्याकरिता विशेष लोकल वाशी येथून संध्याकाळी सुटेल. या विशेष लोकलला रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे आणि सानपाडा या स्थानकांवर थांबतील. राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी  यांच्यासाठी मुंबई विभागातील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर सध्या ७०० लोकल फेऱ्या धावत आहेत. तर, सोमवार पासून आणखीन दोन फेऱ्या वाढल्या आहेत.

निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना या लोकल फेऱ्यामधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. इतर प्रवाशांनी स्थानकावर गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

 

टॅग्स :लोकलमुंबई लोकलमुंबईठाणेनवी मुंबई