Join us

दोघा पुरुषांना दिली महिला शौचालयात जाण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 5:14 AM

वांद्रे रेल्वे स्थानकावरील महिलांच्या राखीव शौचालयात पुरुष प्रवाशांना जाण्याची परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वांद्रे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तब्बल सहा महिन्यांनंतर शुक्रवारी शौचालय कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला.

मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानकावरील महिलांच्या राखीव शौचालयात पुरुष प्रवाशांना जाण्याची परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वांद्रे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तब्बल सहा महिन्यांनंतर शुक्रवारी शौचालय कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला.वांद्रे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर महिलांसाठी बांधलेल्या शौचालयाचा उद्घाटन समारंभ २६ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी पार पडला. मात्र, दुपारी या शौचालयात दोन पुरुष प्रवासी जात असल्याचे आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही बाब रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलीस शौचालयाच्या ठिकाणी पोहोचले, त्या वेळी एक प्रवासी बाहेर पडत असल्याचे पोलिसांना दिसले. तर एक प्रवासी पोलीस येण्याआधीच तेथून निसटला होता. अधिक चौकशी केली असता, पुरुष शौचालयाबाहेर गर्दी असल्याने शौचालय कर्मचारी गुलशन कुमार यानेच संबंधित पुरुषांना महिला शौचालयाचा वापर करण्यास सांगितल्याचे समोर आले.संबंधित घटनेवेळी शेख यांच्या तक्रारीवरून वांद्रे रेल्वे पोलिसांनी प्रवाशासह शौचालय कर्मचाºयाला ताब्यात घेतले होते. महिलांच्या शौचालयाबाबत हलगर्जीपणा दाखवणाºया कंत्राटदाराचा परवाना रद्द करत कारवाई करण्याची मागणी शेख यांनी पत्राद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक यांस केली होती. त्यानंतर या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने गुन्हा नोंद करत शुक्रवारी कारवाईस सुरुवात केली आहे.