दोन मेट्रो आल्या, आणखी चार येणार, फुल स्विंगमध्ये काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2023 02:45 PM2023-06-24T14:45:51+5:302023-06-24T14:46:08+5:30
सीप्झ ते वांद्रे हा पहिला टप्पा वर्षाखेरिस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे कॉर्पोरेशनचे लक्ष्य असून, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी फुल स्विंगमध्ये मेट्रोचे काम सुरू झाले आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो ३ च्या शुभारंभासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आता आणखी वेगाने काम करू लागली असून, मेट्रोच्या चौथ्या आणि पाचव्या रेकचे डबे मुंबईत दाखल झाले आहेत. आता ट्रेनची एकूण संख्या ५ झाली असून, पहिला टप्पा मार्गी लावण्यासाठी आता आणखी ४ ट्रेनची गरज आहे. त्या देखील पुढील काही महिन्यांत मुंबईत दाखल होणार आहेत.
सीप्झ ते वांद्रे हा पहिला टप्पा वर्षाखेरिस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे कॉर्पोरेशनचे लक्ष्य असून, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी फुल स्विंगमध्ये मेट्रोचे काम सुरू झाले आहे.
आंध्र प्रदेशातील श्री सिटीमध्ये मेट्रोच्या कारखान्यात आठ डब्यांच्या मेट्रो तयार केल्या जात आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर मेट्रोचे ८ कोच जोडण्याचे काम केले जाते. आरे येथील कारशेडमध्ये किमान २८ मेट्रो मावणार आहेत. मेट्रो दाखल झाल्यावर तिची टेस्टिंग केली जात आहे.
चाचणी घेतली जात आहे. प्रवाशांच्या प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी आतापासूनच काळजी घेतली जात आहे. एका गाडीतून अंदाजे २४०० प्रवासी प्रवास करू शकतील. ८५ किमी प्रतितास अशा प्रत्यक्षातील प्रचालन वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल. स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे मेट्रोचे डबे किमान ३५ वर्षे टिकू शकतील.