मुंबई : जन्मजात ह्रदयविकार व जन्मानंतर एकाच महिन्यात कोविड-१९ने ग्रासलेल्या दोन महिन्यांच्या बाळाने या दोन्ही आजारांवर यशस्वीपणे मात केल्याची घटना कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली.
नंदुरबार येथील कृष्णा अगरवाल यांच्या एक महिन्याच्या मुलीच्या ह्रदयावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. बाळाला जेव्हा रुग्णालयात भरती केले, तेव्हाच ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचे देखील समजले. त्यामुळे शस्त्रक्रिया दोन आठवड्यानंतर करण्यात आली. ती कोविडमधून पूर्ण बरी होईपर्यंत तिच्या ह्रदयाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले गेले. दोन आठवड्यांनी कोविडमधून बरी झाल्यानंतर या बालिकेवर अतिक्षय गुंतागुंतीची ओपन हार्ट करेक्टिव्ह कार्डियाक सर्जरी यशस्वीपणे पार पडली आणि शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या तब्येतीमध्ये वेगाने सुधारणा घडून आली. २५ एप्रिल रोजी त्या मुलीला घरी पाठवण्यात आले.