घाटकोपर हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 04:52 AM2018-10-26T04:52:38+5:302018-10-26T04:52:47+5:30
काँग्रेसचे कार्यकर्ते मनोज दुबे (४५) यांच्या हत्येप्रकरणी साकीनाका पोलिसांनी गुरुवारी राहुल शर्मा उर्फ आरजे आणि सर्वेश सिंग या आरोपींना अटक केली आहे.
मुंबई : काँग्रेसचे कार्यकर्ते मनोज दुबे (४५) यांच्या हत्येप्रकरणी साकीनाका पोलिसांनी गुरुवारी राहुल शर्मा उर्फ आरजे आणि सर्वेश सिंग या आरोपींना अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार असून या प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे.
शर्मा आणि सिंग हे दोघे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. दुबे यांच्यावरील हल्ल्यात प्रत्यक्ष या दोघांचा संबंध नसला तरी हत्यार पुरविणे आणि कट रचणे असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र त्यांचा या हत्येतील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक केल्याचे साकीनाका पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले. या प्रकरणी उमेश अशोक सिंह (३५) आणि जितेंद्र विद्याचल मिश्रा उर्फ बंदिश (२९) या भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांना दुबे यांच्या हल्ल्याप्रकरणी आधीच अटक झाली आहे. इगतपुरीमधून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. फेसबुक पोस्टसह खासगी वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे तपासात उघड झाले होते.