मुंबईहून आणखी दोन बुलेट ट्रेन, नागपूर, हैदराबाद मार्गावर धावणार; 7 बुलेट ट्रेनसाठी १९५९२ कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 11:58 AM2023-02-05T11:58:51+5:302023-02-05T12:00:03+5:30

रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यांच्या सुविधांसाठी २०२३-२४ अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Two more bullet trains will run on the Nagpur-Hyderabad route from Mumbai; 19592 crore provision for 7 bullet trains | मुंबईहून आणखी दोन बुलेट ट्रेन, नागपूर, हैदराबाद मार्गावर धावणार; 7 बुलेट ट्रेनसाठी १९५९२ कोटींची तरतूद

मुंबईहून आणखी दोन बुलेट ट्रेन, नागपूर, हैदराबाद मार्गावर धावणार; 7 बुलेट ट्रेनसाठी १९५९२ कोटींची तरतूद

Next

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात सात बुलेट ट्रेनसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून त्यातील दोन राज्याला मिळणार आहेत. मुंबईहून नागपूर आणि मुंबईहून हैदराबादसाठी या बुलेट ट्रेन असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनला गती देण्यासाठी आधीच अर्थसंकल्पात तरतूद आहे. पण सर्व सात बुलेट ट्रेनसाठी १९ हजार ५९२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यांच्या सुविधांसाठी २०२३-२४ अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील १३ हजार ५३९ कोटी राज्याला मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम गुजरातमध्ये प्रगतिपथावर सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात या प्रकल्पाचे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडल्याचा आरोप शुक्रवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला होता.

Web Title: Two more bullet trains will run on the Nagpur-Hyderabad route from Mumbai; 19592 crore provision for 7 bullet trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.