आणखी दोन दिवस सरींचा वर्षाव सुरूच राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 03:59 AM2017-08-28T03:59:06+5:302017-08-28T03:59:23+5:30

गणेश चतुर्थीला धो-धो कोसळल्यानंतर, मुंबापुरीत पावसाच्या तुरळक सरी रविवारी कायम होत्या. मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने सोमवार आणि मंगळवारीही मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.

For two more days, the showers will continue! | आणखी दोन दिवस सरींचा वर्षाव सुरूच राहणार!

आणखी दोन दिवस सरींचा वर्षाव सुरूच राहणार!

Next

मुंबई : गणेश चतुर्थीला धो-धो कोसळल्यानंतर, मुंबापुरीत पावसाच्या तुरळक सरी रविवारी कायम होत्या. मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने सोमवार आणि मंगळवारीही मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शहर आणि उपनगरात काही सरी पडण्याची शक्यता आहे, तर मंगळवारी थांबून-थांबून पावसाच्या सरी कोसळतील. ऐन गणेशोत्सवात आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली होती. मात्र, शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर ओसरल्याने, सुट्टीचा आनंद घेणाºया भक्तांना लाडक्या बाप्पाच्या दर्शनाचा मनमुराद आनंद लुटता आला.
मुंबापुरीत कोसळणा-या सरींमुळे शहरासह उपनगरातील उड्डाणपूल परिसरात वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे, तसेच ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पावसाच्या तुरळक सरींमुळे दुचाकीस्वार उड्डाणपुलांचा आसरा घेताना दिसत आहेत. परिणामी, सोमवार व मंगळवारीही पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव सुरूच राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
 

Web Title: For two more days, the showers will continue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.