थोडक्यात दोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:16+5:302021-09-21T04:08:16+5:30
मुंबई - राज्यातील सर्व लोककला टिकून राहाव्यात, लोककलांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन ...
मुंबई - राज्यातील सर्व लोककला टिकून राहाव्यात, लोककलांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन करण्यासाठी लोककलांना उत्तेजन द्यावे, या हेतूने कला पथकांना भांडवली खर्चासाठी आणि प्रयोगासाठी अनुदान देण्यात येते. या अनुदान मंजुरीसाठी शासनामार्फत समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे अध्यक्ष तर सहसंचालक हे सदस्य सचिव असतील. माया खुटेगावकर, सुधीर कलिंगण, दिनेश गोरे, अभय तेरदाळे, पुरुषोत्तम बोंद्रे, अलंकार टेंभुर्णे, सुरेशकुमार वैराळकर, अंबादास तावरे, विलास सोनावणे, मोहित नारायणगावकर हे या समितीत सदस्य असतील. ही समिती ८ सप्टेंबर रोजी निर्गमित शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत कार्यरत असेल.
ओळखपत्र नसलेल्या ४,८६५ लाभार्थ्यांचे लसीकरण
मुंबई - शहर उपनगरात ओळखपत्र नसलेल्या ४ हजार ८६५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तर दिव्यांग असणाऱ्या एकूण ४ हजार १६६ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात खासगी केंद्रात २७३, शासकीय केंद्रात २४१, तर पालिका केंद्रात ३ हजार ६५२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.