अंधेरी, पुण्यातून अन्य दोन डॉक्टरांनाही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 06:14 AM2019-05-30T06:14:11+5:302019-05-30T06:14:31+5:30

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात डॉ. भक्ती मेहेर पाठोपाठ अंधेरीतून डॉ. हेमा आहुजा, तर पुण्यातून डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली आहे.

Two other doctors from Andheri, Pune are also arrested | अंधेरी, पुण्यातून अन्य दोन डॉक्टरांनाही अटक

अंधेरी, पुण्यातून अन्य दोन डॉक्टरांनाही अटक

Next

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात डॉ. भक्ती मेहेर पाठोपाठ अंधेरीतून डॉ. हेमा आहुजा, तर पुण्यातून डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली आहे. या तिघींच्या अटकेनंतर, बुधवारी पायलच्या पतीसह आई-वडिलांचे जबाब नव्याने नोंदविण्यात आले आहेत.
पायलच्या आत्महत्येस या तिघींना जबाबदार धरत, आग्रीपाडा पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होताच, त्या पसार झाल्या होत्या. मंगळवारी भक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अन्य दोघींच्या तपासासाठी सहायक पोलीस आयुक्त दीपक कुंडल यांच्या मार्गदर्शनाखालील पथक या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.
खंडेवाल ही पुण्यात असल्याची माहिती मिळताच तपास पथक पुण्याला रवाना झाले. बुधवारी पुण्यातून तिला अटक करताच, अंधेरीतून अहुजालाही बेड्या ठोकण्यात आल्या.
या प्रकरणात आतापर्यंत १० ते १५ डॉक्टरांचे जबाब नोंदविले आहेत, तर मानसिक धक्क्यात असल्यामुळे पायलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबातून एखादी गोष्ट सुटण्याच्या शक्यतेतून बुधवारी आग्रीपाडा पोलिसांनी पुन्हा पायलचे पती सलमान, वडील सलीम आणि आई अबेदाचे सविस्तर जबाब नोंदविले.
>दोषींवर कडक कारवाई करा!
डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करून तडवी कुटुंबीयांना न्याय द्या, या मागणीसाठी बुधवारी भीम आर्मीने नायर रुग्णालयासमोर निदर्शने केली. शिक्षण आमचा हक्क आहे, तानाशाही चालणार नाही, अशा घोषणा भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी या वेळी दिल्या.
एकीकडे भारत प्रगत राष्ट्राकडे वाटचाल करीत असताना, काही बुरसटलेल्या व्यक्तींमुळे असे प्रकार समाजात घडणे निंदनीय आहे. जाती-धर्मांत भेद करणे थांबवा, अन्यथा बहुजनांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. सरकारने या प्रकरणात विशेष लक्ष घालावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
>तपासाची सूत्रे उपायुक्तांकडे द्या
- नीलम गो-हे
मुंबई : नायर हॉस्पिटलमधील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस उपायुक्त (क्राईम) यांच्याकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोºहे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
जोपर्यंत पायलने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय मेडिकल रिपोर्टबाबत सेकंड ओपिनियन म्हणून फॉरेन्सिक तज्ज्ञ, निपक्ष आणि अभ्यासू डॉक्टर यांचे ओपिनियन घेण्याबाबत देखील विनंती नीलम गोºहे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली
आहे.

Web Title: Two other doctors from Andheri, Pune are also arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.