टॅक्सीतील 2 प्रवाशांनी अंबानींच्या घराचा पत्ता विचारला, अँटिलियाबाहेर सुरक्षा वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 06:08 PM2021-11-08T18:08:42+5:302021-11-08T18:16:45+5:30
मुकेश अंबानींच्या घराचा पत्ता विचारत काही व्यक्तींनी त्यांच्या घराजवळील परिसरात आगमन केले आहे. आम्हाला एका टॅक्सी ड्रायव्हरचा फोन आला. त्यावेळी, टॅक्सीमध्ये बसलेल्या दोन प्रवाशांनी मुकेश अंबानींच्या अँटिलिया या घराचा पत्ता विचारला होता
मुंबई - जगप्रसिद्ध उद्योगपती आणि भारतीतील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराची सुरक्षा पुन्हा एकदा वाढविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ आढळून आली होती. त्यामध्ये, जिलेटीन कांड्याही सापडल्या होत्या. त्यानंतर, या प्रकरणाला वेगळंच वळणं लागलं. त्यामध्ये मुंबई पोलीस दलातील एक अधिकारीच सहभागी असल्याचं उघड झालं. त्यानंतर, आता पुन्हा एकदा अंबीनींच्या घराबाहेर काही संसशास्पद हालचाली झाल्याचे समजते.
मुकेश अंबानींच्या घराचा पत्ता विचारत काही व्यक्तींनी त्यांच्या घराजवळील परिसरात आगमन केले आहे. आम्हाला एका टॅक्सी ड्रायव्हरचा फोन आला. त्यावेळी, टॅक्सीमध्ये बसलेल्या दोन प्रवाशांनी मुकेश अंबानींच्या अँटिलीया या घराचा पत्ता विचारला होता. त्या प्रवाशांकडे दोन बॅगा होत्या, असे टॅक्सी ड्रायव्हरने पोलिसांना फोन करुन सांगितले आहे. त्यामुळे, मुंबई पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
We received a call from a taxi driver that 2 people carrying a bag asked for Mukesh Ambani's residence Antilia; recording his statement. DCP level rank officer monitoring the situation. Security heightened outside Antilia; CCTV footage also being checked: Mumbai Police
— ANI (@ANI) November 8, 2021
सध्या या टॅक्सी ड्रायव्हरचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतले असून डीसीपी पदाच्या रँकींगचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत, असे मुंबई पोलीसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच, अंबानींच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर जिलेटीननी भरलेली स्कॉर्पिओ गाडी काही दिवसांपूर्वी आढळली होती. त्यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा एका खाडीता संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाशी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला विचारला होता. त्यामुळे, अंबानींच्या घराबाहेरील गाडीचा तपास वेगळ्याच वळणाला येऊन पोहोचला होता. आता, पुन्हा एकदा संशयास्पद हालचाली आढळून आल्या आहेत.