गोवंडीमध्ये संपत्तीच्या वादातून गोळीबार, दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 08:31 AM2019-05-27T08:31:19+5:302019-05-27T09:11:30+5:30
गोवंडीमध्ये संपत्तीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी (27 मे) सकाळी 6 वाजता ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : गोवंडीमध्ये संपत्तीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. 4-5 जणांनी केलेल्या गोळीबारात 2 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून देवनार पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीमध्ये संपत्तीच्या वादातून सोमवारी (27 मे) सकाळी 6 वाजता गोळीबार झाला आहे. या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका हल्लेखोराला पकडण्यात स्थानिकांना यश आले आहे. देवनार पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
मुंबई : देवनारमध्ये संपत्तीच्या वादातून गोळीबार #Mumbaipic.twitter.com/SztC6U7Beu
— Lokmat (@MiLOKMAT) May 27, 2019
कौटुंबिक वादातून आपल्याच भाओजीवर गोळीबार करण्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्सावी साकीनाक्यात घडला होता. यामध्ये जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला असून हल्लेखोराला अवघ्या काही तासांतच साकीनाका पोलिसांनी अटक केली होती. ईबनेहसन खान (६०) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
साकीनाक्यात डी. बी. रोड परिसरात असलेल्या नहार अमृत सोसायटीमध्ये खान कुटुंबासोबत राहत होते. त्याच इमारतीत इमामुल्ला सुकरण खान (६०) राहतो. ईबनेहसन यांच्यात मेव्हणा आणि भाओजी असे नाते आहे. दोघांच्या मुलांमध्ये सोयरीक करण्यात आली होती. मात्र त्यांचे एकमेकांशी पटत नसल्याने शेवटी त्यांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. त्यामुळे नात्यात असूनही इमामुल्ला याच्यांशी गेल्या अनेक वर्षांपासून ईसबहसन याचे वाद सुरू होते. शनिवारी दुपारी साडेअकरा-बाराच्या सुमारास ईबनेहसन हे नमाज अदा करण्यासाठी निघाले. त्याचवेळी इमामुल्ला हे त्यांच्या समोर आले आणि त्यांचे पुन्हा भांडण झाले. रागावर नियंत्रण राखता न आल्याने अखेर इमामुल्ला यांनी त्यांच्याकडे असलेल्या परवानाधारी रिव्हॉल्व्हरने ईबनेहसन यांच्यावर गोळी झाडली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि जमिनीवर कोसळले. याबाबत स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षावर कळविले. त्यानुसार साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ईबनेहसन यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.