लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत कोसळणाऱ्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. तुरळक ठिकाणी पडलेल्या मुसळधार सरी वगळता मुंबईकरांचा रविवार कोरडाच गेला. पावसाने विश्रांती घेतली असली तरी ठिकठिकाणी झालेल्या पडझडींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली. दरम्यान, कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरांत अधून-मधून पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.परळ येथे जी. डी. आंबेकर मार्गावर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टॅक्सीवर झाड पडून झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. केईएम रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले असून, मनोहर चंदाणी कोचरेकर आणि विद्यावासिनी राधेश्याम मिश्रा अशी जखमींची नावे आहेत. कुर्ला पश्चिमेकडील कनीज फातीमा चाळ येथील घराच्या पत्र्यावर दरडीचे दगड पडल्याची घटना घडली. दिंडोशी पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या टेकडीचे काही दगड अप्पर गोविंदनगर येथे पडल्याची घटना घडली. पश्चिम उपनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, झिगझॅग रोड, पार्ले मार्केट येथे झाड पडून रस्त्याचा काही भाग खचला. खबरदारी म्हणून येथील भागात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.शहरात २, पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ५ ठिकाणी बांधकामांचा भाग पडला. शहरात १६, पूर्व उपनगरात ३, पश्चिम उपनगरात १५ अशा एकूण ३४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात १२, पूर्व उपनगरात १३, पश्चिम उपनगरात २० अशा एकूण ४५ ठिकाणी झाडे पडली. या दुर्घटनांत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.पावसाची नोंद (मिलीमीटर) च्शहर - ३५.९५च्पूर्व उपनगर - ३९.१७च्पश्चिम उपनगर - २६.९९
झाड कोसळून दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 5:23 AM