Join us  

विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या दोन जणांना अटक

By admin | Published: February 20, 2016 2:59 AM

लोकल डब्यात कथित मोबाइल चोरांना विवस्त्र करून बेदम मारहाण करणाऱ्या दोन जणांना अखेर रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अटक केली. हारीस शेख (२४) आणि नासीम शेख (२३) अशी अटक

मुंबई : लोकल डब्यात कथित मोबाइल चोरांना विवस्त्र करून बेदम मारहाण करणाऱ्या दोन जणांना अखेर रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अटक केली. हारीस शेख (२४) आणि नासीम शेख (२३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मारहाणीची क्लिप दोन ते तीन वर्षांपूर्वीची असल्याचे समोर आले. त्यानंतर या घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर परेल स्थानकात आणि लोकल डब्यात मारहाण झालेल्या दोनपैकी एक असलेल्या वासिम खानला ताब्यात घेऊन सविस्तर माहिती घेण्यात आली. त्यावेळी अशी घटना झाल्याचे मान्य केल्यानंतर दादर रेल्वे पोलिसांत याची तक्रार दाखल करण्यात आली होती. बराच तपास केल्यानंतरदोन आरोपींना अटक करण्यातरेल्वे पोलिसांना यश आले. (प्रतिनिधी)