दोन जण किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:04 AM2020-12-07T04:04:01+5:302020-12-07T04:04:01+5:30
लालबागच्या सिलिंडर स्फोटातील १६ जखमींपैकी १२ जण केईएम रुग्णालयात, तर ४ जण मसिना रुग्णालयात उपचार घेत आहेत. केईएममधील १२ ...
लालबागच्या सिलिंडर स्फोटातील १६ जखमींपैकी १२ जण केईएम रुग्णालयात, तर ४ जण मसिना रुग्णालयात उपचार घेत आहेत. केईएममधील १२ जणांपैकी १० जण ५० ते ८० टक्के भाजले असून उर्वरित दोघे किरकोळ भाजले आहेत. सर्वांना अत्यावऋश्यक सेवेतील उपचार सुरू असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींपैकी प्रथमेश मुंगे, रोशन अंधारी, मंगेश राणे, महेश मुंगे, सुशीला बगारे, ज्ञानदेव सावंत हे ७० ते ८० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर विनायक शिंदे, ओम शिंदे, यश राणे, करिम, मिहिर चव्हाण, ममता मुंगे हे ३५ ते ५० टक्के भाजले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. तसेच वैशाली, हिंमाशु, त्रिशा, बिपिन, सूर्यकांत हे ७० ते ९५ टक्के भाजले असून त्यांना मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
...............................