Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरी इमारत दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 03:26 PM2019-07-16T15:26:14+5:302019-07-16T15:28:37+5:30

आतापर्यंत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाले आहेत.   

 Two people were dead and seven others injured in dongri building collapsed | Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरी इमारत दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी

Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरी इमारत दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी

Next
ठळक मुद्देया दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पालिका, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे.  साबिया निसार शेख (२५) या महिलेचा आणि हबीब रुग्णालयात दाखल केलेल्या अब्दुल सत्तार कालू शेख (५५) या दोघांचा मृत्यू ढिगाऱ्यात सापडलेल्या एका अज्ञात व्यक्तीवर हबीब रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

मुंबई - मुंबईतील डोंगरी परिसरातील तांडेल स्ट्रीट येथे असलेल्या कौसरबाग इमारत कोसळल्याची घटना आज घडली. यामध्ये ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पालिका, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली आहे. 

जे. जे. रुग्णालयात दाखल केलेल्या साबिया निसार शेख (२५) या महिलेचा आणि हबीब रुग्णालयात दाखल केलेल्या अब्दुल सत्तार कालू शेख (५५) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर जे. जे. रुग्णालयात फिरोज नाझिर सलमानी(४५), आयशा शेख (३), स्लम अब्दुल सत्तार शेख (५५), अब्दुल रहमान (३), नावेद सलमानी (३५), इम्रान हुसेन कल्वानिया (३०) या जखमींवर उपचार सुरु आहेत आणि ढिगाऱ्यात सापडलेल्या एका अज्ञात व्यक्तीवर हबीब रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

Mumbai Dongri Building Collapsed: 'राज्य सरकार जबाबदार अन् मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी' 

Web Title:  Two people were dead and seven others injured in dongri building collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.