मुंबई- गोरेगावातल्या पश्चिम भागातल्या मोतीलाल नगरमध्ये एक निर्माणाधीन इमारत कोसळली आहे. ही इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी आहेत. गोरेगावात ही दुमजली इमारत कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे.
गोरेगावात दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, सात जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 11:24 AM