‘त्या’ दोघा पोलिसांची अखेर बदली

By admin | Published: May 3, 2016 01:19 AM2016-05-03T01:19:43+5:302016-05-03T01:19:43+5:30

टिळकनगर पोलीस ठाण्यात ड्युटी ठरवणारे साहाय्यक फौजदार सुभाष हामरे व वरिष्ठ निरीक्षकाचा आॅर्डली कॉन्स्टेबल संदीप शिखरे यांची पूर्व प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षामध्ये बदली

The two police officers finally changed | ‘त्या’ दोघा पोलिसांची अखेर बदली

‘त्या’ दोघा पोलिसांची अखेर बदली

Next

मुंबई : टिळकनगर पोलीस ठाण्यात ड्युटी ठरवणारे साहाय्यक फौजदार सुभाष हामरे व वरिष्ठ निरीक्षकाचा आॅर्डली कॉन्स्टेबल संदीप शिखरे यांची पूर्व प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खैरे यांच्याविरुद्धच्या आरोपाची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती या विभागाचे अप्पर आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली. ‘वरिष्ठ निरीक्षकांविरुद्ध बंड’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात दिले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने ही कारवाई केली.
या पोलीस ठाण्यातील हवालदार प्रभाकर देसाई यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कर्तव्यवाटपात वादग्रस्त वरिष्ठ निरीक्षक विजय खैरे यांच्याकडून होत असलेल्या त्रासामुुळे हे कृत्य करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहिले होते. त्याचप्रमाणे खैरे व त्यांचा आॅर्डली कॉन्स्टेबल शिखरे यांच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यातील सर्व २६ अधिकाऱ्यांनी अन्यत्र बदली मागितली आहे. जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने ड्यूटी लावणे व अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने होणाऱ्या खच्चीकरणामुळे त्यांनी संयुक्तपणे ही मागणी केली आहे. एखाद्या वरिष्ठाविरुद्ध पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदारांनी संयुक्तपणे तक्रार करण्याची ही पहिलीच घटना असल्याने ‘लोकमत’ने ही बाब चव्हाट्यावर आणली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाण्यात ड्युटीचे वाटप करणारे साहाय्यक फौजदार हामरे व आॅर्डली शिखरे यांची पूर्व प्रादेक्षिक विभागाच्या नियंत्रण कक्षात बदली केली. त्यांच्याविरुद्धचा एसीपी रौफ शेख यांचा अहवाल आपल्याला मिळाला आहे, त्यानुसार ही कारवाई केली आहे, खैरे यांच्याविरुद्ध अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपाची चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे अप्पर आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने ड्यूटी लावणे व अधिकारी - कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने होणाऱ्या खच्चीकरणामुळे त्यांनी संयुक्तपणे ही मागणी केली आहे. एखाद्या वरिष्ठाविरुद्ध पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदारांनी संयुक्तपणे तक्रार करण्याची ही पहिलीच घटना असल्याने ‘लोकमत’ने ही बाब चव्हाट्यावर आणली.

Web Title: The two police officers finally changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.