Join us

रेल्वेवरील दगडफेकीत दोन पोलीस जखमी

By admin | Published: February 13, 2016 2:04 AM

मुंब्रा बोगद्याजवळ लागोपाठच्या दोन लोकलवर दगडफेकीच्या घटना घडल्या असून, दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनाच दगड लागले आहेत.

डोंबिवली : मुंब्रा बोगद्याजवळ लागोपाठच्या दोन लोकलवर दगडफेकीच्या घटना घडल्या असून, दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनाच दगड लागले आहेत.ठाण्याकडून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकलवर मुंब्य्रातील बोगद्यातून बाहेर ट्रेन येताच अज्ञाताने दगडफेक केली. त्यात दोन पोलीस जखमी झाले. या दोन्ही वेगवेगळ्या घटना आहेत. प्रथम खोपोली फास्ट ट्रेनमध्ये सुदर्शन नरवडे या पोलीस कॉन्स्टेबलच्या ओठांवर दगडाचा फटका लागून ते जखमी झाले. तर, त्याच लोकलच्या मागून येणाऱ्या कसारा फास्ट लोकलमधील सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रमोहन गायकवाड हे महिलांच्या डब्यात गार्ड होते. ते दरवाजात उभे असताना त्याच ठिकाणी पुन्हा लोकलच्या दिशेने दगड मारल्याने त्यांच्या डोळ्यांखाली मार लागला. गायकवाड हे दादर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)