दोन पोलिसांना अतिकामाचा फटका
By admin | Published: March 31, 2016 02:34 AM2016-03-31T02:34:52+5:302016-03-31T02:34:52+5:30
टिळकनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मंगळवारी रात्री तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वरिष्ठ अधिकारी
Next
मुंबई : टिळकनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मंगळवारी रात्री तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वरिष्ठ अधिकारी अधिक वेळ काम करून घेत असल्याने प्रकृतीवरील ताण वाढत असल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सध्या शहरातील अनेक पोलीस ठाण्यांत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यांच्या कामाचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर येत आहे. चेंबूरच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात असाच प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्रपाळीसाठी आलेले पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव आणि छाया निकम या दोन्ही अधिकाऱ्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यामुळे इतर सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले.