मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त गावांतील दहा शाळांतील ४९ शिक्षकांना प्रकल्पग्रस्तांसाठी नव्याने बांधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत समायोजन केले जाणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. जिल्हा परिषद शाळांसाठी तीन भूखंडांचे वाटप झाले आहे. त्यापैकी दोन शाळा नवीन शैक्षणिक वर्षात सुरू होणार आहेत.नवी मुंबई विमानतळासाठी १० गावांचे स्थलांतर करण्यात आले. मात्र त्या गावांतील शाळांमधील शिक्षकांबाबत अद्याप काही निर्णय झालेला नसल्याने आ. बाळाराम पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना दोन शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 5:38 AM