‘पंजाब महाल’ला लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ महिलांचा गुदमरून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:36 AM2019-05-25T06:36:28+5:302019-05-25T06:36:34+5:30

भेंडीबाजारातील दुर्घटना : अग्निशमन दलाच्या चार जवानांसह सात रहिवासी जखमी

Two senior women died due to a fire in 'Punjab Mahal' | ‘पंजाब महाल’ला लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ महिलांचा गुदमरून मृत्यू

‘पंजाब महाल’ला लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ महिलांचा गुदमरून मृत्यू

googlenewsNext

मुंबई : भेंडीबाजारातील बोहरी मोहल्ला येथील तळमजला अधिक चार मजल्यांच्या पंजाब महाल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर, गुरुवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ महिलांचा गुदमरून मृत्यू झाला, तर अकरा जण जखमी झाले. जखमींमध्ये सात रहिवाशांसह चार अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे. फरिदा मास्टर (६०) आणि नफिसा गीतम (६०) अशी या दुर्घटनेतील मृत महिलांची नावे आहेत.


पंजाब महाल इमारतीच्या तिसºया मजल्यावर गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आठ फायर इंजिनच्या मदतीने आग विझविण्याचे, तसेच दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले.


चौथ्या मजल्यावर अडकलेल्या दोन महिलांसह दोन पुरुषांना खिडकीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांच्यासह अन्य सात रहिवाशांनाही इमारतीतून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, हे सातही रहिवाशी जखमी झाले. त्यांना जे.जे. रुग्णालयात उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले. या आगीत अग्निशमनचे चार जवानही किरकोळ जखमी झाले.


दरम्यान, रहिवाशांना वाचविण्याचे काम वेगाने सुरू असतानाच, अग्निशमन दलाच्या जवानांना चौथ्या मजल्यावरील खोली क्रमांक ४० मध्ये दोन महिलांचे मृतदेह आढळून आले. त्यांचा मृत्यू गुदमरून झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात आला आहे. इमारतीला लागलेल्या या आगीत इलेक्ट्रिक वायरिंगसह घरातील साहित्य जळून खाक झाले असून, आगीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दुर्घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे

घटनास्थळी दाखल होण्यासाठी काच फोडून हटवले वाहन
भेंडीबाजारातील या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान वाहनांसह घटनास्थळी रवाना झाले. मात्र त्या ठिकाणी पोहोचण्याकरिता त्यांना बºयाच अडथळ्यांचा सामना करावा लागला. इमारतीच्या ठिकाणी अनधिकृतपणे पार्क करण्यात आलेली वाहने, गर्दी यातून वाट काढत इमारतीपर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते. महत्त्वाचे म्हणजे येथे उभ्या असलेल्या काही वाहनांपैकी एका वाहनाची अडचण होत असल्याने अखेर त्या वाहनाची काच फोडून ते वाहन तेथून हटविण्यात आले. त्यानंतरच अग्निशमन दलाला वाहन व अन्य सामग्री घेऊन घटनास्थळी पोहोचता आले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

Web Title: Two senior women died due to a fire in 'Punjab Mahal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.