मुंबई : माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर अज्ञात तरुणीचा विनयभंग करणाºया तरुणाला चोप देणाºया शिवसेनेचा पदाधिकारी नितीन नांदगावकर (वय ५०, रा. चेंबूर) याच्यासह दोघांना अॅन्टॉप हिल पोलिसांनी अटक केली. दर्शनसिंग कोचर (४५.रा. रा. प्रतीक्षानगर) असे दुसºयाचे नाव असून, शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. नांदगावकरने मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यांनी कायदा हातात घेतल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सायन विभागाचे सहायक आयुक्त भरत भोईटे यांनी सांगितले.माटुंगा रोड रेल्वे स्थानक परिसरात एकजण अज्ञात तरुणीची छेड काढून पलायन करीत असल्याचा व्हिडीओ ५ फेबु्रवारीला व्हायरल झाला होता. त्याबाबत पोलिसांनी संबंधित तरुण रझीबूर खान (वय ३८) याचा शोध घेऊन त्याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर, नांदगावकर व त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला पकडून कार्यालयात नेले. त्या जाब विचारीत अमानुषपणे मारहाण केली होती, खान याच्यावर कायदेशीर कारवाई झाली असताना, नांदगावकर व त्याच्या सहकाºयांनी कायदा हातात घेऊन त्याला मारहाण केल्याने कारवाई करण्यात आल्याचे भरत भोईटे व वरिष्ट निरीक्षक प्रशांत राजे यांनी सांगितले.
‘त्या’ तरुणाला चोपणाऱ्या दोघा शिवसैनिकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 3:58 AM