इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांना चोरी करताना उमरोळीत अटक

By admin | Published: November 16, 2016 04:05 AM2016-11-16T04:05:40+5:302016-11-16T04:05:40+5:30

उमरोळी येथील रामचंद्र पाटील यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडे तोडून आत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या व इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या

Two students of engineering were stolen while trying to steal | इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांना चोरी करताना उमरोळीत अटक

इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांना चोरी करताना उमरोळीत अटक

Next

पालघर : उमरोळी येथील रामचंद्र पाटील यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडे तोडून आत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या व इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांना एका महिलेने पकडले. चोरीच्या अनेक घटनांनी त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी त्यांची यथेच्छ धुलाई करून त्यांना पालघर पोलिसांच्या स्वाधीन केले.
पालघर-बोईसर मार्गावरील उमरोळी गावातील ग्रामस्थ मागील महिन्यातील सततच्या चोरीच्या घटना घडत असल्याने खूप संतप्त होते. १ नोव्हेंबर भाऊबीजेला पहाटे नरेंद्र पांडुरंग राऊत यांच्या घराच्या टेरेस वरील दरवाजा तोडून चोरट्यानी ७० हजाराची रोख रक्कम, मोटारसायकल व मोबाईल असा ऐवज चोरून नेला होता. तर लगेच चार दिवसांनी दिलीप बाळा घरत यांच्या ही घराच्या टेरेस वरील दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रोख, सोन्याची साखळी, चांदीचे पैंजण असा ६० ते ६५ हजाराचा ऐवज चोरला.
रामचंद्र पाटील हे आपल्या कुटुंबियांसह बाहेर गेले असताना संध्याकाळी ३ ते ४ च्या सुमारास गौरव पटेल (वय १८ वर्ष) याने त्यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्याचा मित्र लामखेडे हा आपल्या स्कूटी सह बाहेर पाळत ठेवून उभा होता. गौरव घरात चोरीचा प्रयत्न करीत असताना त्याच्या हातून पडलेल्या एका वस्तूच्या आवाजाने शेजारच्या महिलेने पाहिले असता दरवाजा तोडलेल्या अवस्थेत कोणीतरी घरात शिरल्याचे पाहून त्यांनी दरवाजा बंद केला. त्यामुळे चोरी करण्यासाठी घुसलेल्या गौरवने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने दरवाजा घट्ट पकडून आरडा ओरडा केल्याने मोठा जमाव जमला. त्याने या दोघांना बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. (वार्ताहर)

Web Title: Two students of engineering were stolen while trying to steal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.