एचपीसीएल, बीपीसीएल कंपनीचे दोन हजार कंत्राटी कर्मचारी पगारापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 01:37 AM2020-05-06T01:37:35+5:302020-05-06T01:37:40+5:30
आम्हाला फेब्रुवारीचा २१ दिवसांचा पगार देण्यात आला असून जो अॅडव्हान्स देण्यात आला होता तो कापून घेण्यात आला आहे
मुंबई : एचपीसीएल, बीपीसीएल कंपनीत तीन हजार कंत्राटी कर्मचारी काम करतात. यामधील दोन हजार कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपासूनचा पगार अद्याप मिळाला नाही. दरम्यान, कंपनीच्या कामगारांचा पगार कंत्राटदारांना देण्यात आला आहे. तरीही जर कामगारांना पगार मिळाला नसेल तर कंत्राटदारांना पगार देण्यास सांगण्यात येईल, असे एचपीसीएल आणि बीपीसीएल कंपनीच्या वतीने सांगण्यात
आले.
याबाबत एचपीसीएलच्या एका कर्मचाºयाने सांगितले की, आम्हाला २४ मार्चपर्यंत पगार मिळाला. त्यानंतर ना पगार मिळाला ना आगाऊ रक्कम मिळाली. माझ्या काही सहकाऱ्यांना तर फेब्रुवारीपासून पगार मिळाला नाही. त्यातच आम्हाला कामावरून कमी करण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे. टोकन मागण्यात येत आहे. याबाबत आम्ही तक्रार केली, पण काही कारवाई झाली नाही.
तर दुसºया कर्मचाºयाने सांगितले की, आम्हाला फेब्रुवारीचा २१ दिवसांचा पगार देण्यात आला असून जो अॅडव्हान्स देण्यात आला होता तो कापून घेण्यात आला आहे. पैसे नसल्याने आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ आली असून, आम्ही कंपनीकडे कंत्राटदार पैसे देत नसल्याची तक्रार केली. परंतु आम्ही कंत्राटदाराला पैसे दिले असून असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
तर बीपीसीएलच्या कर्मचाºयाने आम्हाला लॉकडाउन घोषित केल्यापासून पगार मिळाला नाही. आमच्याकडे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैसे नाहीत. पगाराबाबत आम्ही कंत्राटदाराला विचारपूस केली असता देऊ नंतर, असे सांगतात. आम्हाला आता भाजीपाला, किराणा माल उधारही मिळत नाही. सकाळी चणे-शेंगदाणे खातो. काही न्याहारी करत नाहीत. दुपारी आणि सायंकाळी सामाजिक संस्था, कार्यकर्ते जेवणवाटप करतात ते घेऊनच त्यावर आम्ही गुजराण करतो.
कमी करण्याची धमकी
एका कर्मचाºयाने सांगितले की, आम्हाला २४ मार्चपर्यंत पगार मिळाला. त्यानंतर ना पगार मिळाला ना आगाऊ रक्कम मिळाली. माझ्या काही सहकाºयांना तर फेब्रुवारीपासून पगार मिळाला नाही. कामावरून कमी करण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे.