Join us

१५ दिवसांत डेंग्यूचे दोन हजार संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 4:13 AM

मुंबई शहर उपनगरांतील बदलत्या वातावरणाचा फटका मुंबईकरांना बसत आहे. ऊन-पावसाचा खेळ आणि जोडीला असलेल्या भयंकर उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

मुंबई : मुंबई शहर उपनगरांतील बदलत्या वातावरणाचा फटका मुंबईकरांना बसत आहे. ऊन-पावसाचा खेळ आणि जोडीला असलेल्या भयंकर उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. या बदलत्या वातावरणामुळे आजारांचे प्रमाणही वाढते आहे. त्यामुळे वेळीच लक्षणे ओळखून डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आॅक्टोबर महिन्यातील १५ दिवसांत डेंग्यूचे १२४ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, फक्त १५ दिवसांत डेंग्यूचे १ हजार ९६३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत, तसेच सप्टेंबर महिन्यात १५ दिवसांत डेंग्यूचे १६४ रुग्ण आढळले होते. शिवाय, १५ दिवसांत डेंग्यूचे १ हजार ६५९ संशयित रुग्ण आढळून आले होते.वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. थोडा ताप जरी आला, तरी तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन सल्ला आणि उपचार घ्यावेत.- डॉ. मीनी खेतरपाल, पालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाच्या प्रमुख

टॅग्स :हॉस्पिटलडॉक्टरमुंबई