मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भीषण पाणीटंचाई काही प्रमाणात दूर करण्याकरिता बारवी धरणाची उंची वाढवून या क्षेत्रातील लोकांकरिता अतिरिक्त दोन टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. यासंदर्भात पुढील आठवड्यात मंगळवारी सर्व संबंधितांची बैठक बोलावण्याचे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी दिले.संजय दत्त, जोगेंद्र कवाडे, मुझफ्फर हुसेन आदी सदस्यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई असून महिलांना दूरवरून पाणी आणावे लागते. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, कल्याण-डोंबिवली महापालिकेची पाणीटंचाईची सोडवण्याकरिता २००५ पासून बारवी धरणाची उंची वाढवण्याची योजना अमलात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या महापालिका क्षेत्राला बारबी धरणातून ६ टीएमसी व मावळ येथील धरणातून ७.५ टीएमसी पाणी देण्यात येऊनही १४ टक्के तूट आहे.बारवी धरणाची उंची वाढवण्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून यामुळे दोन गावांतील १२० लोकांचे पुनर्वसन करावे लागेल. याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण झाले तर पावसाळ््यात बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होईल. (विशेष प्रतिनिधी)पाणीटंचाईची समस्या अत्यंत भीषण असून, महिलांना दूरवरून पाणी आणावे लागते. धरणाची उंची वाढवण्याबाबत पुढील आठवड्यात मंगळवारी सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने निकाली काढावा.
कल्याण-डोंबिवली पालिकेस दोन टीएमसी पाणी
By admin | Published: March 28, 2015 1:43 AM