लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ (रायगड) : नेरळजवळील आनंदवाडी धबधब्यावर रविवारी बुडून एकाचा मृत्यू झाला, तर पेब किल्ल्याच्या पायथ्याशी कोसळून दुसऱ्या एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, कर्जत तालुक्यात गेल्या दोन दिवसांत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आषाणे येथे घडलेल्या घटनेतील वाहून गेलेल्या मुलीचा शोध अजूनही बचाव पथक घेत आहे.रविवारी नेरळजवळील आनंदवाडी धबधब्यावर वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी मुलुंड येथून सहा जणांचा ग्रुप आला होता. त्यातील सुरेश चेंचकर (रा. मुलुंड) यांचा पाय घसरून आनंदवाडी धबधब्यावरील खोल डोहात तो बुडाला, यात त्याचा मृत्यू झाला. तर पेब किल्ल्याच्या पायथ्याशी एक व्यक्ती रविवारी सकाळी जखमी अवस्थेत पोलिसांना आढळली. त्या वेळी त्याने अब्दुल असे आपले नाव असून, मलंगगड (कल्याण) येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला नेरळ पोलिसांनी पुढील उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले होते; परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पाली भूतीवली धरणात एकाचा बुडून मृत्यू कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणात रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनीष दामोदर धामणसकर (२५, रा. वाकोला ब्रीज धोबीघाट, मुंबई) असे मृताचे नाव आहे. या घटनेची माहिती नेरळ पोलिसांनी दिली.
कर्जत तालुक्यात दोन पर्यटकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 5:26 AM