मुंबई : बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वे वंदे भारत एक्स्प्रेस अखेर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून धावणार आहे. मुंबई ते साईनगर शिर्डी आणि सोलापूर ते मुंबई मार्गावर दोन वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखविणार असल्याची माहिती मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. आता मध्य रेल्वेवर महाराष्ट्रात चालविण्यासाठी वंदे भारतचा दोन रेक पुढील महिन्यात दाखल होणार आहे. सीएसएमटी-साई नगर शिर्डी ५ तास ५५ मिनिटांचा प्रवास सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातील सहा दिवस (गुरुवार वगळता) धावणार असून, ५ तास ५५ मिनिटांचा प्रवास असणार आहे. संध्याकाळी सव्वासहा वाजता सुटून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, नाशिक रोडला थांबणार आहे.सोलापूर-सीएसएमटी सहा तास ३० मिनिटांत प्रवास सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातील सहा दिवस (बुधवार वगळता) धावणार आहे. सहा तास ३० मिनिटांत प्रवास असणार आहे. सोलापूर येथून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटून दुपारी १२.३५ वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डूवाडीला थांबणार आहे.
आठवड्यातून सहा दिवस धावणार‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये १६ एसी डबे असणार आहेत. मुंबई ते साईनगर शिर्डी आणि सोलापूर ते मुंबई मार्गावर या दोन्ही मार्गांवर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ मंगळवार सोडून आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.