सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील दोघांना एका दिवसासाठी मिळाली पदोन्नती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 03:05 AM2020-07-15T03:05:41+5:302020-07-15T06:14:55+5:30

प्रादेशिक परिवहन विभागातील मोटारवाहन निरीक्षक या पदावरील २४ अधिकाऱ्यांना साहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्याचा आदेश २९ जून २०२० रोजी जारी झाला.

The two on the verge of retirement got promotions for one day | सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील दोघांना एका दिवसासाठी मिळाली पदोन्नती

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील दोघांना एका दिवसासाठी मिळाली पदोन्नती

Next

मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) अनेक पदे रिक्त आहेत. यासंदर्भात आता पात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठीच्या पदोन्नतीची २४ जणांची यादी तयार करण्यात आली आहे. यातील दोघे सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांना एका दिवसासाठी पदोन्नती देण्यात आली. तर अर्थकारणामुळे २२ जणांच्या पदोन्नतीचे आदेश निघाले नाहीत, अशी चर्चा आरटीओ विभागात आहे.
प्रादेशिक परिवहन विभागातील मोटारवाहन निरीक्षक या पदावरील २४ अधिकाऱ्यांना साहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्याचा आदेश २९ जून २०२० रोजी जारी झाला. यातील दोन अधिकारी ३० जून रोजी निवृत्त होणार असल्याने त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये कोकण विभागातील मोटारवाहन निरीक्षक अशोक यादव यांची मुंबई पश्चिम विभागात साहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून तर पुणे विभागातील मोटारवाहन निरीक्षक रमेश माळवदे यांची सातारा येथे साहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, या अधिकाºयांना पदोन्नती मिळाल्यानंतर केवळ एकच दिवस मिळाला.
लवकरच आदेश जारी करणार
परिवहन विभागातील एका अधिकाºयाने सांगितले की, पदोन्नती यादीतील २२ जणांची बढती प्रलंबित राहण्यामागे अर्थकारण कारणीभूत आहे. या अधिकाºयांनी अर्थपूर्ण व्यवहार पूर्ण न केल्याने त्यांच्या पदोन्नतीत चालढकल केली जात आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार मोहन बोर्डे यांचा पहिला क्रमांक आहे, परंतु त्यांना पदोन्नती मिळाली नाही. यादव यांचा १९ वा क्रमांक आणि माळवदे यांचा ५६ वा क्रमांक आहे, पण केवळ निवृत्तीमुळे त्यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, पदोन्नतीची यादी तयार करण्यात आली असून लवकरच बढती आणि बदलीचे आदेश जारी करण्यात येतील, असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: The two on the verge of retirement got promotions for one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई