Join us

लालबाग उड्डाणपुलावर अपघातात भरधाव वेगाचे दोन बळी

By मनीषा म्हात्रे | Published: January 28, 2024 11:10 PM

लालबाग उड्डाणपुलावर भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीचा अपघात  झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.  दुचाकी संरक्षक भींतीला धडकून झालेल्या या अपघाताप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

मुंबई : लालबाग उड्डाणपुलावर भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीचा अपघात  झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.  दुचाकी संरक्षक भींतीला धडकून झालेल्या या अपघाताप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

   या अपघातात ऋषीकेश सालकर(२५) व शैलेश सैद(४०) या दोघांचा मृत्यू झाला आहे. सहाय्यक फौजदार सुधाकर माने (५४) यांच्या तक्रारीवरून चालक सालकरविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. लालबाग उड्डाणपुलावर शनिवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  घटनास्थळी पुलाच्या संरक्षण भींतीवरील लोखंडी रोलिंगला एक व्यक्ती अडकला होता. तर दुसरा रस्त्यावर पडलेला दिसला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ भिंतीवर अडकलेल्या व्यक्तीला खाली काढले. दोघांनाही तत्काळ जे.जे. रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

       प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी भरधाव वेगाने चालवत पुलाच्या दिशेने गेले होते. वेगामुळे वाहनावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा संशय आहे. त्यानुसार, परिसरातील सीसीटिव्ही तसेच अन्य पुराव्यांच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहे.