लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सांताक्रुझ - चेंबूर लिंक रोड ब्रिजवरुन भरधाव वेगाने जात असताना चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू
झाला आहे. याप्रकरणी मृत आरोपी चालकाविरोधात टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोवंडीतील नटवर पारेख कम्पाऊंड परिसरात राहण्यास असलेल्या रेहमत अकबर मुल्ला (२६) आणि मित्र हसन मोहम्मद शेख (२६) यांचा यात मृत्यू झाला आहे. रेहमत हा हसन सोबत दुचाकीवरून माहीमवरून घरी परतत असताना शनिवारी हा अपघात झाला. अमरमहल जंक्शनजवळ रेहमत याचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले. यात रेहमत याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले, तर उपचारादरम्यान हसनने प्राण सोडले. याप्रकरणी टिळकनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.