पनवेलमध्ये खांदा गावात ‘दोन गाव एक गणपती’
By Admin | Published: September 19, 2015 12:52 AM2015-09-19T00:52:37+5:302015-09-19T00:52:37+5:30
पनवेल तालुक्यातील नगरपरिषद हद्दीतील धाकटा खांदा व मोठा खांदा या दोन गावांमध्ये एकच गणपती बसविण्याची परंपरा आहे. दहा हजाराची लोकवस्ती असलेल्या या गावांमध्ये धाकटा खांदा या गावात
- वैभव गायकर, पनवेल
पनवेल तालुक्यातील नगरपरिषद हद्दीतील धाकटा खांदा व मोठा खांदा या दोन गावांमध्ये एकच गणपती बसविण्याची परंपरा आहे. दहा हजाराची लोकवस्ती असलेल्या या गावांमध्ये धाकटा खांदा या गावात स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे. याच मंदिरात भवानी माता, श्री वेताळेश्वर महाराज, श्री वाघेश्वर महाराज, नंदी आदी पुरातन मूर्ती आहेत. याठिकाणी गणेशाचे विसर्जन केले जात नसून भक्तांनी वाहिलेले निर्माल्य, विविध वस्तू आदीचे विसर्जन केले जाते.
धाकटा खांदा गाव वसण्यापूर्वी पनवेल परिसरात प्लेगची प्रचंड साथ पसरली होती. यावेळी स्थलांतर करीत असताना नागरिकांना जुन्या गणेश मंदिर परिसरात विविध प्राचीन मूर्त्या सापडल्या. त्यावेळच्या गावकऱ्यांनी १८५६ साली या गावात गणेशाचे मंदिर बांधून पूजा अर्चा सुरु केली. एखाद्याने या दोन गावामध्ये गणेशाची स्थापना केल्यास त्यांना विविध अडीअडचणींना सामोरे जावे लागले. तेव्हा पासून च दोन्ही ग्रामस्थांनी याठिकाणी दोन गाव एक गणपतीच्या परंपरेचा पायंडा पाडला. गणेशोत्सवाच्या काळावधीमध्ये दोन्ही गावचे ग्रामस्थ भजन, कीर्तन, भारुड, आदीसह परंपरागत बाल्या नृत्याचे कार्यक्र म याठिकाणी करीत असतात. घरो घरी गणेशोत्सव न साजरा करता या काळात ग्रामस्थांनी स्थापन केलेल्या श्री गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत भोजनाची व्यवस्था केली जाते. यामुळे गावकऱ्या मध्ये एकोपा टिकून राहत असल्याची प्रतिक्रि या स्थानिक नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या काळावधीमध्ये अनेक ठिकाणी एक गाव एक गणपती ही परंपरा पहावयास मिळते. मात्र धाटा व मोठा खांदा ग्रामस्थांची दोन गाव एक गणपती हि परंपरा इतर गावांसमोर आदर्श निर्माण करणारी परंपरा आहे. गावाचा एकोपा टिकवून ठेवत राजकारणाला यापासून दूरच ठेवल्यामुळे आजही ही परंपरा अविरत सुरु आहे .