श्वानाच्या पायावरून नेली दुचाकी; ग्रँटरोडमधील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:32+5:302021-09-18T04:06:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ग्रँटरोड येथील लॅम्गिंटन रोड येथील त्रिभुवन गल्लीमध्ये नुकतेच मॅक्स नावाच्या श्वानाच्या पायावरून दुचाकी नेण्यासह त्याला ...

A two-wheeler driven by a dog's foot; Shocking type in Grantroad | श्वानाच्या पायावरून नेली दुचाकी; ग्रँटरोडमधील धक्कादायक प्रकार

श्वानाच्या पायावरून नेली दुचाकी; ग्रँटरोडमधील धक्कादायक प्रकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

ग्रँटरोड येथील लॅम्गिंटन रोड येथील त्रिभुवन गल्लीमध्ये नुकतेच मॅक्स नावाच्या श्वानाच्या पायावरून दुचाकी नेण्यासह त्याला लाथ मारण्यात आल्याची घटना घडली. मॅक्स रस्त्याच्या कडेला बसलेला असताना डिमलँड सिनेमाकडून दुचाकीवर दोन जण घटनास्थळी आले. त्यांनी मॅक्सच्या पायावरून गाडी नेली. शिवाय त्याला लाथ मारून पुढेदेखील गेले. घटना घडली त्या परिसरात अनेक जण असूनदेखील कोणीच त्यांना हटकले नाही. येथे घडलेली घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून, या मदतीने पोलिसांनी संबंधितांचा माग काढावा, अशी मागणी नमोनम: बहुद्देशीय संस्थेने केली आहे.

या घटनेनंतर मॅक्स बरा असला तरीदेखील अशा घटनांना आळा बसावा याकरिता यंत्रणेने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. कारण यापूर्वीही भर दिवसा अशा घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे श्वानांना जबर इजा झाली आहे, तर अनेक रस्ते एक दिशा असून, दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांकडून येथील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे, अशी माहितीदेखील संस्थेकडून देण्यात आली.

Web Title: A two-wheeler driven by a dog's foot; Shocking type in Grantroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.