दुचाकीवरील सहप्रवासी हेल्मेटविनाच

By Admin | Published: May 23, 2016 03:32 AM2016-05-23T03:32:10+5:302016-05-23T03:32:10+5:30

दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही परिवहन विभागाकडून हेल्मेटसक्ती करण्यात आली असली तरीही मागच्या सीटवर बसलेले बहुतेक जण हेल्मेटशिवायच प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले आहे

Two-wheeler helmetvinech | दुचाकीवरील सहप्रवासी हेल्मेटविनाच

दुचाकीवरील सहप्रवासी हेल्मेटविनाच

googlenewsNext

मुंबई : दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही परिवहन विभागाकडून हेल्मेटसक्ती करण्यात आली असली तरीही मागच्या सीटवर बसलेले बहुतेक जण हेल्मेटशिवायच प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या सहप्रवाशांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली. त्यात गेल्या २३ दिवसांत तब्बल ४१ हजार २५७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम १२९नुसार दुचाकीस्वार चालकाबरोबरच त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीलाही परिवहन विभागाकडून जानेवारी २0१६पासून हेल्मेटसक्ती करण्यात आली. हेल्मेटसक्ती करतानाच २00३मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आधार परिवहन विभागाने घेतला आहे. एखादा अपघात झाल्यास दुचाकीस्वाराबरोबरच सहप्रवाशालाही हेल्मेट नसल्याने प्राणास मुकावे लागते. त्यामुळेच सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांतील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानुसार मुंबईत हेल्मेट न वापरणाऱ्या सहप्रवाशावरही कारवाई केली जात आहे. २९ एप्रिलपासून वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, सुरुवातीच्या तीन दिवसांत ३ हजार ९0४ सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती.
कुलाबा, आझाद मैदान, काळबादेवी, घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला, साकीनाका, वांद्रे आणि मालाड वाहतूक विभागांतर्गत सर्वाधिक कारवाई झाली आहे. (प्रतिनिधी)सीट बेल्ट न लावणाऱ्यांविरोधातही कारवाई
दुचाकींवरील सहप्रवाशांबरोबरच चार चाकीमधून चालकाच्या बाजूला बसणाऱ्या सहप्रवाशाविरोधातही सीट बेल्टचा वापर न केल्यास कारवाई केली जात आहे. यासाठीही विशेष मोहीम हाती घेण्यात आलीआहे. आतापर्यंत १६ हजार ११९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. २0१५मध्ये १८९ अपघातांत दुचाकीस्वार मृत्युमुखी पडले. यात १२७ दुचाकीस्वारांबरोबर ६२ सहप्रवाशांनीही जीव गमावला, तर सुमारे २४१ सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.च्वर्षाकाठी जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांवर कारवाई होत आहे. मागील वर्षात जवळपास २ लाख ७0 हजार दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. सहप्रवाशांना पकडताना त्यांच्याकडून १00 रुपये दंड वसूल केला जात आहे. ारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.

Web Title: Two-wheeler helmetvinech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.