दोन वर्षांत २१९ बालगुन्हेगार ताब्यात

By Admin | Published: March 23, 2015 12:33 AM2015-03-23T00:33:48+5:302015-03-23T00:33:48+5:30

रेल्वे आणि स्थानक परिसरात होणाऱ्या चोऱ्यांमध्ये बालगुन्हेगारही मागे नसल्याचे समोर आले आहे.

In the two years 219 culprits have been arrested | दोन वर्षांत २१९ बालगुन्हेगार ताब्यात

दोन वर्षांत २१९ बालगुन्हेगार ताब्यात

googlenewsNext

मुंबई : रेल्वे आणि स्थानक परिसरात होणाऱ्या चोऱ्यांमध्ये बालगुन्हेगारही मागे नसल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) दोन वर्षांत केलेल्या कारवाईत तब्बल २१९ बालगुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात विविध गुन्ह्यांना सामोरे जावे लागते. सोनसाखळी, घड्याळ चोरणे, पाकीटमारी, बॅग चोरी यासह खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, हाणामारी अशा विविध गुन्ह्यांमुळे प्रवास कठीण झाला आहे. रेल्वे पोलिसांकडून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी नुकत्याच सादर केलेल्या गुन्हेगारीच्या आकडेवारीत रेल्वेतील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसते. २०१३मध्ये २ हजार ६७६ विविध गुन्हे घडले होते. यात १ हजार ७२0 गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. मात्र २०१४मध्ये गुन्हेगारीत मोठी वाढ झाली असून, तब्बल ३ हजार ११८ गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. यापैकी १ हजार ७११ गुन्हे उघड झाल्याचे सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेत घडलेल्या काही गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यांनी मोबाइल चोरी, पाकीटमारी यासह छोट्या-मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. २०१३-१४मध्ये विविध गुन्ह्यांमध्ये रेल्वे पोलिसांनी एकूण २१९ बालगुन्हेगारांना अटक केली आहे. २०१३मध्ये १३२ आणि २०१४मध्ये ८७ बालगुन्हेगारांना अटक केल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.
यामध्ये सीएसटी, कुर्ला, ठाणे, कल्याण, वांद्रे, बोरीवली, पालघर पोलीस ठाण्यांतर्गत मोठ्या प्रमाणात बालगुन्हेगारांना पकडण्यात आले आहे.

पकडण्यात आलेल्या बालगुन्हेगारांची माहिती पुढीलप्रमाणे
पोलीस ठाणेवर्ष वर्ष
२0१३२0१४
सीएसटी१६—
दादर१३
कुर्ला१८१९
ठाणे२९१३
डोंबिवली—४
कल्याण८८
कर्जत२६
वडाळा१६
वाशी६१
पनवेल—५
चर्चगेट२१
मुंबई सेंट्रल२२
वांद्रे११—
अंधेरी३३
बोरीवली१४१२
वसई१८४
पालघर१—

Web Title: In the two years 219 culprits have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.