कार अपघातानंतर दोन वर्षांनी नायजेरियन तरुणी उभी राहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:57 AM2018-06-19T05:57:28+5:302018-06-19T05:57:28+5:30

कार अपघातामुळे दोन वर्षांहून अधिक काळ अंथरुणाला खिळलेल्या १९ वर्षीय नायजेरियन युवतीने पहिले पाऊल टाकले आहे.

Two years after the car accident, the Nigerian girl stood | कार अपघातानंतर दोन वर्षांनी नायजेरियन तरुणी उभी राहिली

कार अपघातानंतर दोन वर्षांनी नायजेरियन तरुणी उभी राहिली

Next

मुंबई : कार अपघातामुळे दोन वर्षांहून अधिक काळ अंथरुणाला खिळलेल्या १९ वर्षीय नायजेरियन युवतीने पहिले पाऊल टाकले आहे. संपूर्ण हिप व सॉकेट रिकन्स्ट्रक्शनसह, ही युवती शस्त्रक्रियेनंतर एका आठवड्यातच घरी जाण्याकरिता सज्ज झाली आहे. मुलुंड येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली.
नायजेरियातील झिनातू उमर ही १९ वर्षीय तरुणी सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या एका जीवघेण्या कार अपघातानंतर अडीच वर्षांहून अधिक काळ अंथरुणाला खिळली होती. शाळेतील मैत्रिणींसोबत घरी येताना हा अपघात झाला. अपघातानंतर तिला तेथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, जिथे प्राथमिक उपचार करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, कंबरेपासून ते पायापर्यंत तिला जबर मार लागला आहे आणि तिच्यावर शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. तिचे मांडीचे हाड बसविण्यात आले (कंबर ते गुडघ्यापर्यंतचे वाढलेले हाड) व कमरेच्या हालचालीसाठी ग्रीप बसवून तिला घरी सोडण्यात आले.
फेब्रुवारी २०१७ मध्ये तिच्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली. स्थानिक डॉक्टरांनी हिप विरुपतेकरिता एका सुधारात्मक प्रकियेची शिफारस केली. अद्ययावत तंत्रज्ञानाभावी नायजेरियाच्या डॉक्टरांनी तिची स्थिती अधिक सुधारता येत नसल्याचे सांगितले. तिचे हिप सॉकेटच्या बाहेर आले होते आणि बॉल व सॉकेटदेखील फ्रॅक्चर झाले होते. यामुळे तिला अंथरुणाला खिळून राहावे लागले आणि त्यामुळे तिचे शाळेत जाणेही बंद झाले. तिच्या तब्येतीत सुधारणा होण्याची शक्यता धुसर झाल्याने तिच्या वडिलांनी मुंबईला धाव घेतली.
डॉ. कौशल मल्हान यांनी तिच्या हिप व गुडघ्याची तपासणी केल्यानंतर, तिच्या हिपला गंभीर दुखापत झाली आहे आणि उशिरा आल्याने तिच्या हिपवर मोठा परिणाम झाल्याचे त्यांना आढळले. डॉ. मल्हान यांनी तिला टोटल हिप रिप्लेसमेंट (टीएचआर) आणि रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करण्याची शिफारस केली. या प्रक्रियेमध्ये हाडाच्या ग्राफ्टिंगद्वारे हिप व सॉकेटचे रिकन्स्ट्रक्शन करण्यात आले. दुखापत झालेल्या हिपच्या भागात नवीन बॉल व सॉकेटचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
>ती पुन्हा शाळेत जाऊ शकेल
टोटल हिप रिप्लेसमेंट अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी ही अशी प्रक्रिया आहे, ज्यात हिप जॉइंटचे तुटलेले बॉल व सॉकेट पूर्णपणे काढून टाकले जाते आणि ते शरीरात त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या हाडांच्या साह्याने बदलले जाते. संपूर्ण शस्त्रक्रियेकरिता अडीच तासांचा कालावधी लागला; आॅपरेशननंतर रुग्णाला देखरेखीखाली ठेवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर क्रचेशचा वापर करून आपले निम्मे वजन गुडघ्यांवर टाकत ती चालू शकते. तिच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत आणि ती लवकरच आपल्या घरी जाऊ शकणार आहे, तसेच ती घरी परतल्यानंतर शाळेतही जाऊ शकणार आहे आणि शिक्षण पुढे सुरू ठेवू शकणार आहे.
- डॉ. कौशल मल्हान
डॉ. कौशल मल्हान यांनी तिला टोटल हिप रिप्लेसमेंट आणि रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करण्याची शिफारस केली. या प्रक्रियेमध्ये हाडाच्या ग्राफ्टिंगद्वारे हिप व सॉकेटचे रिकन्स्ट्रक्शन केले गेले.

Web Title: Two years after the car accident, the Nigerian girl stood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.