बांधकाम व्यावसायिकांना दोन वर्षाचा कारावास

By admin | Published: October 5, 2014 02:20 AM2014-10-05T02:20:03+5:302014-10-05T02:20:03+5:30

सुमारे पाच वर्षापूर्वी ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणा:या दोन बांधकाम व्यावसायिकांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दोन वर्षाचा कारावास आणि 1क् हजारांचा दंड दिला आहे.

Two years of imprisonment for builders | बांधकाम व्यावसायिकांना दोन वर्षाचा कारावास

बांधकाम व्यावसायिकांना दोन वर्षाचा कारावास

Next
>ठाणो : सुमारे पाच वर्षापूर्वी ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणा:या दोन बांधकाम व्यावसायिकांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दोन वर्षाचा कारावास आणि 1क् हजारांचा दंड दिला आहे.
वासुदेव गुजरे हे चरई येथे राहत होते. परंतु, ते वास्तव्यास असलेली इमारत महापालिकेने धोकादायक जाहीर केल्याने अशोक पारेख आणि महेंद्र जैन या बांधकाम व्यावसायिकांनी इमारत विकासाचे काम हाती घेतले होते. यामध्ये त्यांनी गुजरे यांच्यासह अन्य रहिवाशांना सवलतीच्या दराने जास्त जागा देण्याचे मान्य केले. त्यानुसार, ठरलेल्या फ्लॅटच्या 3 लाख 65 रकमेपैकी गुजरे यांनी 5क् हजार बांधकाम व्यावसायिकांना दिले. परंतु, काही कालावधीनंतर झालेल्या वादामुळे इमारतीचे बांधकाम अर्धवट सोडण्यात आले. दरम्यान, फ्लॅट मिळावा, यासाठी गुजरे यांनी दोन्ही बांधकाम व्यावसायिकांकडे मागणी केली. तो न दिल्याने अखेर ऑक्टोबर 2क्क्8 ला गुजरे यांनी अशोक पारेख आणि महेंद्र जैन या बांधकाम व्यावसायिकांविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. सुमारे 5 वर्षे तक्रार चालल्यानंतर फ्लॅटचा ताबा 1 महिन्यात तसेच 1 लाख 75 हजार नुकसानभरपाई देण्याचे आदेश मंचाने दिले होते. 
परंतु, दोघा व्यावसायिकांनी आपसातील वादामुळे मंचाच्या आदेशाची पूर्तता केली नाही. या बेजबाबदार कृतीमुळे ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत अशोक पारेख आणि महेंद्र जैन या दोघांना मंचाने दोषी ठरवून दोन वर्षाचा कारावास आणि 1क् हजारांचा दंड सुनावला आहे. तर दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अधिक कारावास भोगावा लागणार आहे. 

Web Title: Two years of imprisonment for builders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.