टीवाय बी.कॉमचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 05:38 AM2018-02-21T05:38:55+5:302018-02-21T05:39:12+5:30
मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बी.कॉमचे पाचव्या आणि सहाव्या सत्राचे निकाल मंगळवारी जाहीर झाले, पण विद्यापीठाचे संकेतस्थळ हँग झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास विलंब झाला
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बी.कॉमचे पाचव्या आणि सहाव्या सत्राचे निकाल मंगळवारी जाहीर झाले, पण विद्यापीठाचे संकेतस्थळ हँग झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास विलंब झाला.
पाचव्या सत्राच्या निकाल ६२.२० टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी ७८ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती, त्यापैकी ७७ हजार २७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ६२.२० टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी जाहीर केले आहे.
जाहीर झालेल्या निकालात ३ हजार ७७ विद्यार्थ्यांना ओ ग्रेड मिळाली, तर १६ हजार ११४ विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळाली. सर्वाधिक २८ हजार ५९३ विद्यार्थी ‘एफ’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले. तर सहाव्या सत्राचा निकाल ४५.२४ टक्के लागला आहे.
मंगळवारी संध्याकाळपर्यंत २१० निकाल जाहीर केल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. सकाळच्या सुमारास संकेतस्थळ हँग झाल्याने निकाल पाहणे विद्यार्थ्यांसाठी कठीण
झाले होते.