Join us  

टीवाय बीकॉमचा निकाल जाहीर

By admin | Published: February 25, 2017 3:59 AM

टीवाय बीकॉमच्या पाचव्या सत्राचा निकाल अखेर तीन महिन्यांनंतर जाहीर झाला. टीवाय बीकॉमच्या पाचव्या सत्रात एकूण ५७.४२ टक्के उत्तीर्ण झाले आहेत.

मुंबई : टीवाय बीकॉमच्या पाचव्या सत्राचा निकाल अखेर तीन महिन्यांनंतर जाहीर झाला. टीवाय बीकॉमच्या पाचव्या सत्रात एकूण ५७.४२ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. बीकॉमच्या तृतीय वर्षातील पाचव्या सत्राच्या परीक्षेसाठी एकूण ७८ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७८ हजार ७४२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. १ हजार ७५२ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. ३२ हजार ५४५ विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. ‘ओ’ श्रेणीत ३ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. ‘ए’ श्रेणीत १३ हजार ९६ विद्यार्थी, बी श्रेणीत ११ हजार ३२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, सी श्रेणीत ९ हजार ४५२, डी श्रेणीत ५ हजार २८९ आणि ई श्रेणीत १ हजार २४२ विद्यार्थी पास झाले आहेत. परीक्षा झाल्यापासून ४० दिवसांच्या आता परीक्षेचा निकाल जाहीर झाला पाहिजे. पण तीन महिने उलटूनही निकाल लागला नव्हता. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले होते. सहाव्या सत्राच्या परीक्षेची तयारी सुरू करूनही पाचव्या सत्राचा निकाल जाहीर झाला नव्हता. अखेर मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला आहे. (प्रतिनिधी)