मुंबई : लहान मुलाला आई गोष्ट सांगते आणि अशा गोष्टी ऐकतच मूल मोठे होते. म्हणजेच गोष्ट किंवा कथा ऐकणे हे बालपणापासून सर्वांना आवडत असते. ही कथेची भूक कधीच संपत नाही. त्यामुळे कथा हा प्रकार कधीच नष्ट होणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी साहित्यातल्या ‘कथा’ या प्रकाराची महती विशद केली. ह्यकथाक्लबह्ण तर्फे आयोजित ‘त्रिवेणी - गप्पागोष्टींच्या’ या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात लेखिका छाया पिंगे यांचे ह्यपाऊस निनादत होताह्ण, राजश्री बर्वे यांचे ह्यशंख आणि शिंपलेह्ण व चित्रा वाघ यांचे ह्यअथांगह्ण या तीन कथासंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे आणि चारुशीला ओक यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तिघींच्या कथा आजच्या काळाचे प्रतिनिधित्व करतात. त्या सामाजिक प्रश्नांना भिडत समाजमनालाही गवसणी घालतात, असे गौरवोद्गार मधु मंगेश कर्णिक यांनी या कथासंग्रहांविषयी बोलताना काढले.‘कथाक्लब’च्या सर्वेसर्वा माधवी कुंटे व चारुशीला ओक यांनी, तुम्ही केलेले काम म्हणजे एक मापदंड असून यापुढेही अशाच लिहित्या रहा असा आशीर्वाद छाया पिंगे, राजश्री बर्वे व चित्रा वाघ या तिघींना यावेळी दिला. तीन जीवलग मैत्रिणींचा हा ‘त्रिवेणी’ सोहळा त्यांच्या गप्पागोष्टींतून उत्तरोत्तर रंगत गेला. (प्रतिनिधी)
‘कथा हा प्रकार नष्ट होणार नाही’
By admin | Published: December 27, 2016 1:42 AM