Join us  

उबर कंपनीचे 3,500 चालक

By admin | Published: December 13, 2014 2:17 AM

दिल्लीत उबर टॅक्सी कंपनीच्या चालकाने एका तरुणीवर केलेल्या बलात्कारानंतर या कंपनीच्या सेवेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले.

मुंबई, पुण्यात सेवा: परिवहन विभागाला कंपनीने दिली माहिती
मुंबई : दिल्लीत उबर टॅक्सी कंपनीच्या चालकाने एका तरुणीवर केलेल्या बलात्कारानंतर या कंपनीच्या सेवेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यानुसार राज्यातील परिवहन विभागाने खासगी टॅक्सीचालकांची आणि त्यांच्या वाहनांची माहिती घेण्यास सुरुवात केली आणि तसे आदेशही टॅक्सी कंपन्यांना दिले. टॅक्सीचालकांची गुरुवारी माहिती देऊ न शकलेल्या उबर कंपनीने शुक्रवारी परिवहन विभागाला माहिती दिली. यात मुंबई आणि पुण्यात सेवा सुरू असून तब्बल 3,500 चालक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 
खासगी टॅक्सी कंपनीच्या वाहनांची आणि चालकांची माहिती देण्यासाठी परिवहन विभागाने या कंपन्यांची एक बैठक बुधवारी बोलावली होती. या बैठकीत टॅक्सी कंपन्यांना चालकांची माहिती आणि सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांची माहिती देण्यासाठी मुदत दिली होती. त्यानुसार चालकांची माहिती गुरुवारी दुपारी 12 वाजेर्पयत देण्याचे 
आदेश टॅक्सी कंपन्यांना दिले होते. मात्र 8 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांनी चालक आणि वाहनांची माहिती परिवहन विभागाला दिली. यात माहिती 
न देणा:यांमध्ये उबर कंपनीचा 
समावेश होता. 
नॅदरलँडमध्ये सव्र्हर असल्याने माहिती देण्यास थोडा उशीर होत असल्याचे उबर कंपनीकडून सांगण्यात आले आणि शुक्रवारी चालकांची माहिती देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार उबर कंपनीने 3,500 चालकांची माहिती परिवहन विभागाला उपलब्ध केल्याचे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले; तर वाहनांची माहिती सोमवार्पयत देण्यात येणार आहे. 
उबर कंपनीची सेवा मुंबई आणि पुण्यात सुरू असून, या दोन्ही ठिकाणी असलेल्या चालकांची संख्या 3,500 असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुंबईत या कंपनीच्या जवळपास 2 हजार टॅक्सी धावत आहेत.  (प्रतिनिधी)
 
अंधेरी आणि वडाळा आरटीओकडून 19 अनधिकृत रिक्षांवर कारवाई केली. तर 36 प्रकरणांत रिक्षाचालक-मालक आपल्याजवळ रिक्षाची कागदपत्रे बाळगत नसल्याचे निदर्शनास आले. ताडदेव आरटीओकडून 71 टूरिस्ट कॅबची तपासणी करण्यात आली आणि यात 6 वाहनचालकांवर कारवाई केली.  
 
त्याचप्रमाणो ताडदेव आरटीओकडून भाडे नाकारणा:या 170 चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करताना जवळपास 1 लाख रुपये दंड वसूल केला आहे. तर 1क् दिवसांकरिता चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले.