ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 02 - उबर कंपनीने आता टॅक्सी सेवेसोबतच फूड डिलिव्हरी सर्व्हिस सुरु केली आहे. उबरइट्स या नावाने ही नवीन फूड डिलिव्हरी सर्व्हिस मुंबईत सुरु केली असून कंपनीने यासाठी 200 रेस्टॉरंटसोबत भागिदारी केली आहे.
उबरइट्स इंडियाचे प्रमुख भाविक राठोड यांनी सांगितले की, भारतात सुरु करण्यात आलेली उबरइट्स फूड डिलिव्हरी सर्व्हिस जागतिक स्तरावर नेण्याचा मानस आहे. हे एक मोठे पाऊल आहे. मुंबई हे पहिले शहर आहे की, आम्ही फूड डिलिव्हरी सर्व्हिसमध्ये उतरलो आहोत. तसेच, यानंतर आम्ही दिल्ली, बंगळुरु, चेन्नई आणि कोलकाता याठिकाणीही ही सर्व्हिस राबविणार आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही भूमिका निश्चित करण्यात आली नाही.
दरम्यान, उबर कंपनीची फूड डिलिव्हरी सर्व्हिस ही भारतातील पहिली आहे. मात्र, याआधी जोमेटा, फूट पांडा, स्विगी अशा कंपन्या या क्षेत्रात काम करत आहेत. तसेच, गुगलने सुद्धा बंगळुरुमध्ये आपली Areo सर्व्हिस लॉन्च केली आहे. याचबरोबर उबर कंपनीची प्रतिस्पर्धी कंपनी ओलाने सुद्धा दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि हैदराबादमध्ये फूड डिलिवरी सर्व्हिस सुरु केली होती. मात्र कालांतराने ही सर्व्हिस बंद केली.