सीमा महांगडे
मुंबई:मुंबई विद्यापीठातील ग्रंथालयाची इमारत म्हणायला नवी कोरी आहे, पण तीही पाच वर्षांपासून धूळ खात पडून आहे. वाचक आहेत, पण पुस्तकांची पुरती वाट लागली आहे. करोडोंची ग्रंथसंपदा वाळवी लागल्याने पोत्यात भरली जात आहे. रद्दीत काढली जात आहे. अत्यंत संतापजनक असा हा प्रकार शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या, जगात नावलौकिक मिळालेल्या मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या बाबतीत घडला आहे.
लोकमतच्या बातमीचा इॅम्पॅक्टयाच जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या दुरावस्थेबाबत लोकमतच्या अंकातील बातमीनंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ग्रंथालयाला भेट दिली. जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची भेट घेऊन माहिती घेताना त्यांनी विद्यापीठाच्या अभियंत्यांना इमारतीच्या दुरावस्थेवरून चांगलेच धारेवर धरले. यावेळी विद्यापीठाचे अभियंता शरद राणे उपस्थित होते.
'याप्रकरणात सरकार लक्ष घालेल'मोडकळीस आलेली इमारत आणि त्याची दुरवस्था विद्यार्थी आणि तेथे काम करणाऱ्या लोकांसाठी कशी धोकादायक ठरू शकते हे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय पुस्तकांचा जतन केलेला ठेवा हा कधीच कालबाह्य होत नसतो असे सांगत तात्काळ नवीन ग्रंथालयाच्या निवासी प्रमाणपत्रासाठी बैठक घेण्याच्या सूचना ही केल्या. विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह, ग्रंथालय इमारत, परीक्षा भवन आणि इतर सर्व इमारतींचा पाहणी दौरा ते करणार असल्याची माहिती सामंत यांनी लोकमतला दिली. याशिवाय विद्यार्थी हितासाठी विद्यापीठातील महत्त्वाच्या इमारतींकडे शासन स्वतः लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले.
स्थापना
- राजाबाई टॉवर ग्रंथालय : फेब्रुवारी १८८०
- जवाहरलाल नेहरू ग्रंथालय : १८ ऑक्टोबर १९७६
- एकूण ग्रंथसंपदा : ७ लाख ९२ हजार ०१८
- संदर्भ पुस्तके : ११,६६८
- भारतीय जर्नल्स : १७२
- परदेशी जर्नल्स : ४१५
- पुरातन कालखंड जर्नल्स : ७७,२९२
- सीडी/ व्हीसीडी : २२५७
- डेटाबेस : ३०
- ऑनलाइन जर्नल्स : १० हजारांहून अधिक
- हस्तलिखिते : ९,९००
- अरेबियन हस्तलिखिते : १,१९०
- पर्शियन व उर्दू भाषांतील हस्तलिखिते : ७,५००
संबंधित बातमी- संतापजनक! काेट्यवधींच्या ग्रंथसंपदेचा विद्यापीठात कचरा