Join us

'उदयनराजे 'आपला माणूस', अग्रलेखातून त्यांचा अपमान केलाच नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 1:46 PM

शिवसेनेनं उदयनराजेंना समज देताना, शिस्त, तत्व, संस्कार, नितिमत्त आणि साधनशुचिता या पंचसुत्रीवर भाजपाचा डोलारा उभा आहे.

मुंबई - साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उदयनराजेंच्या कॉलर उडवण्यावरुन टीका केली आहे. आता, उदयनराजेंना शिस्त लागली आहे, भाजपात कॉलर उडवणे जमत नाही, असे शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेच्या या अग्रलेखाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी उदयनराजेंचं पुन्हा एकदा कौतुक केलं आहे. उदयनराजे हे 'मुक्त विद्यपीठ' आहेत, असे फडणवीस यांनी म्हटलंय. त्यानंतर आता, उद्धव ठाकरेंनींच या अग्रलेखाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

शिवसेनेनं उदयनराजेंना समज देताना, शिस्त, तत्व, संस्कार, नितिमत्त आणि साधनशुचिता या पंचसुत्रीवर भाजपाचा डोलारा उभा आहे. अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपाच्या शिस्तीत बसत नाहीत. शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा. पण, याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याच्या राजांना दिली असेल, असे म्हटले होते. त्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले होते. त्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उदयनराजेंबद्दलच्या अग्रलेखावर स्पष्टीकरण दिलं आहे. ''सामना मध्ये लिहलेला अग्रलेख हा शुद्ध मराठीत लिहंलेला आहे. त्यामध्ये कुठेही उदयनराजेंचा अपमान करण्यात आलेला नाही. उदयनराजे हे आपला माणूस आहे. त्यामुळे आपल्या माणसाकडून काही अपेक्षा ठेवण्यात गैर काय?'' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंचं समर्थन केलं, त्यावर प्रतिक्रिया दिली. 

दरम्यान, 'सामना' हे केवळ वृत्तपत्र आहे, आपण सगळे पत्रकार आहात, अनेकजण लिहितात, प्रश्न विचारतात. मात्र, प्रत्येकाच्या प्रश्नाला मी उत्तर द्यायचं का? असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी पत्रकारांना केला होता. तसेच, उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहेत. कॉलर उडवणे हे त्यांची स्टाईल आहे. त्यांना जिथं वाटतं तिथं ते कॉलर उडवतात. त्यांच्यासारखं प्रत्येकाला जमत नाही. ते व्यासपीठावर असले की तसं करत नाहीत. ते जनतेमध्ये, तरुणांमध्ये असल्यानंतरच तसं करतात. कारण, त्यांची ही स्टाईल तरुणाईला आवडते. मला कॉलर उडवणं जमतं का, अन् ते जमणारही नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंच्या कॉलर उडविण्याचं समर्थन केलं होतं. 

टॅग्स :मुंबईउदयनराजे भोसलेउद्धव ठाकरेशिवसेनाराजकारण