मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्याकरीता परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. जमिनी विकण्यासाठी उदयनराजे यांना परवानगी देण्याचे आमिष भाजपने दाखवले असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशाराही मलिक यांनी दिला.शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहिला पाहिजे. त्याला जर कोणी धक्का लावत असेल तर जनतेला सोबत घेऊन आम्ही कडाडून विरोध करू. सातारा किंवा अन्य कोणत्याही संस्थानांतील जमिनी कायद्याने विकता येत नाहीत. स्वत:साठी वापरता येत नाहीत. भाजप सरकार या जागा विकण्याच्या आमिषापोटी राजे, संस्थानिकांना भाजपमध्ये आणत आहेत.उदयनराजे भोसले हे १९९९ पूर्वी भाजपचे आमदार व मंत्री होते. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा पराभव केला होता. नंतर ते त्यांच्या आईच्या माध्यमातून साहेबांना भेटले. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना खासदार केले. त्यानंतरही ते वारंवार पक्षविरोधी भूमिका घेत होते. निवडणुका जवळ आल्या की, ते पुन्हा आईच्या माध्यमातून पवार साहेबांना भेटायचे. तिकीट मिळवायचे आणि पुन्हा निवडून यायचे अशी टिप्पणी मलिक यांनी केली.>उदयनराजेंना पर्याय कोण?सातारा : उदयनराजेंना टक्कर देऊ शकेल, अशा उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील या निवडणुकीत उमेदवार असू शकतात. तर नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे श्रीनिवास पाटील आणि शशिकांत शिंदे असे दोन हुकमाचे एक्के आहेत. शिवसेनेची ही जागा कायमस्वरुपी भाजपला द्यावी लागणार आहे. यास सेना तयार होणार का? हा प्रश्न आहे.>सातारा लोकसभा लढविण्याचे नियोजन नाही - चव्हाणपक्षश्रेष्ठींकडून लोकसभेची निवडणूक लढविण्याबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत. तसेच कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी तयारी केल्यामुळे सातारा लोकसभा लढविण्याचे नियोजन नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपमध्ये, राष्ट्रवादीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 6:12 AM