Join us

उदयनराजेंंचे अजूनही तळ्यात-मळ्यात! पुण्यातील बैठक निष्फळ; राजे मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 3:03 AM

प्रत्यक्षात कुठलाही निर्णय होताना दिसत नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजप प्रवेशाबाबत सोमवारी निर्णय घेणार, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात होते; परंतु उदयनराजेंचे अजूनही तळ्यात-मळ्यात सुरू असल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन उदयनराजे भाजपमध्ये जाणार, ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, हीच चर्चा त्यांच्या लोकसभा निवडणुकीआधीही सुरू होती. प्रत्यक्षात कुठलाही निर्णय होताना दिसत नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे. साताऱ्यात यासाठी जोर बैठका पार पडल्यानंतर सोमवारी पुण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र ही बैठक झालीच नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. सर्वजण पुण्यात जाऊन बसले; परंतु उदयनराजे मुंबईला निघून गेले. त्यामुळे उदयनराजेंच्या मनात नेमकं काय चाललंय...याचा थांगपत्ता लागेना, अशी स्थिती आहे. कार्यकर्ते केवळ अंदाज बांधण्यात गुंतले आहेत. काहीजण सांगतात उदयनराजे भाजपमध्ये निश्चित जाणार तर तितकेच लोक उदयनराजे हे खा. शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम ठेवून अडचणीच्या वेळेत त्यांच्यासोबत राहणार, असे सांगत आहेत.

टॅग्स :उदयनराजे भोसलेराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा