Join us

Udayanraje bhosale : सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, सरकारवर जबरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 3:47 PM

Udayanraje bhosale : आपल्या कटोऱ्यात जमा झालेले पैसे प्रशासनाकडे सुपूर्द करून उदयनराजेंनी कठोरपणे प्रशासनावर टीका केली. कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडॉऊन हा एकमेव पर्याय आहे, असे कुठला तज्ञ सांगतो

ठळक मुद्देसरकारमध्ये इच्छाशक्तीच नसेल तर आपण काय करु शकतो. इथं ढिगानं पैसे खात आहेत, आज लोकांना लसीकरण मिळेना. ज्यांनी लस घेतल्या आहेत, तेही कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत.

मुंबई/सातारा - कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडॉऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडॉऊन तत्काळ उठवा अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला. शनिवारपासून सक्तीचे लॉकडॉऊन सुरू झाले आहे. या विरोधात खासदार उदयनराजे यांनी सातारा शहरात शनिवारी अनोखे भीक मांगो आंदोलन केले. त्यावेळी, वाझे प्रकरणावरुनही त्यांनी संताप व्यक्त केला. 

आपल्या कटोऱ्यात जमा झालेले पैसे प्रशासनाकडे सुपूर्द करून उदयनराजेंनी कठोरपणे प्रशासनावर टीका केली. कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडॉऊन हा एकमेव पर्याय आहे, असे कुठला तज्ञ सांगतो. त्याचे स्पष्टीकरण आधी जनतेला व्हायला हवे. आता केलेला लॉकडॉऊन अत्यंत चुकीचा आहे. लोक नियम पाळणार नाहीत. उद्यापासून नेहमीप्रमाणे सर्व यंत्रणा सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारमध्ये इच्छाशक्तीच नसेल तर आपण काय करु शकतो. इथं ढिगानं पैसे खात आहेत, आज लोकांना लसीकरण मिळेना. ज्यांनी लस घेतल्या आहेत, तेही कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. या बाजारबुंडग्यांनी बाजार मांडलाय का हा, तो वाझे, हा वाझे कोण आहे तेच मला कळत नाही? असे म्हणत वाझे प्रकरणावरुन उदयनराजे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोण हा वाझे, एवढे पैसे मग यापूर्वी किती. याला यवढे पैसे, त्याला तेवढे पैसे. पण, इथं गोरगरीबांच का नुकसान करताय. लॉकडाऊन करण्याचा अधिकार तु्म्हाला दिला कुणी? असा आक्रमक सवाल उदयनराजेंनी विचारला आहे. लॉकडाऊन करणाऱ्यांना अकलेचा भाग आहे का, एकतरी मेडीकल सायन्सचा स्टुंडट आहे का? तुमचे काळे कारनामे लपविण्याकरता लॉकडाऊन करता का, असेही उदयनराजेंनी म्हटले.  

टॅग्स :उदयनराजे भोसलेसचिन वाझेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस